श्री. विक्रम कुमार (भा.प्र.से.) हे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून दि. २३.०६.२०२६ रोजी रुजू झाले आहेत. ते महाराष्ट्र कॅडरच्या २००४ बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. महापारेषणमध्ये रुजू होण्यापूर्वी ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) येथे अतिरिक्त महानगर आयुक्त-१ म्हणून कार्यरत होते. श्री. विक्रम कुमार यांनी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदवी प्राप्त केली असून त्यांना नागरी प्रशासन, पायाभूत सुविधा विकास, औद्योगिक प्रगती आणि सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील २० वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी अशा विविध महत्त्वाच्या पदांवर यशस्वीपणे काम केले आहे. त्यांना प्रशासन, प्रकल्प व्यवस्थापन, पायाभूत सुविधा विकास, संघबांधणी आणि धोरणात्मक नेतृत्वाचा व्यापक अनुभव आहे.