पृष्ठ लोड ॲनिनेशन.

श्रीमती. आभा शुक्ला (आय.ए.एस)

श्रीमती. आभा शुक्ला (आय.ए.एस)

अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा), महाराष्ट्र शासन

श्रीमती आभा शुक्ला (आय.ए.एस) १९९३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. फेब्रुवारी २०२४ पासून त्या महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा दक्षता ब्युरो, नागरी हवाई वाहतूक, वित्त विभागांसह विविध ठिकाणी काम केले आहे. आदिवासी तसेच वस्त्रोद्योग विभागात अपर आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी भूगोल विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे..

त्यांनी अनेक ‘मिड- करिअर’ कार्यक्रमांतही सेवा काळात सहभाग नोंदविला आहे. त्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आय.आय.एम.) आणि दि एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (तेरी) येथे हवामानातील बदल आणि राज्यांची पूर्वतयारी-परिणाम, भेद्यता आणि अनुकूलन अर्थात-क्लायमेट चेंज अँड स्टेट प्रिपेडनेस-इम्पॅक्ट्स, व्हलनेरॅबिलिटी अँड अॅडॉप्टेशन याचेही सेवांतर्गत प्रशिक्षण घेतलेले आहे.